सोलापूर : ग्रामीण व शहरी भागातील डेंग्यू रुग्ण बरे झालेले असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सर्वांनी आपापल्या घराचा परिसर, घरातील पाणीसाठे आठवड्यातून एकदा रिकामे करून स्वच्छता ठेवावी, जेणेकरून डास उत्पत्तीस आळा बसेल. यामुळे आपल्याला, आपल्या गावाला तालुक्याला कीटकजन्य आजारांपासून सुरक्षा मिळेल असे सोलापूरचे जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल यांनी सांगीतले.
पावसाळयात हिवताप डेंग्यू, मेंदूज्वरसारखे आजार साथीच्या स्वरूपात वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे हिवताप प्रतिबंधासाठी नागरिकांनी दर आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे. हिवताप, डेंग्यू, मेंदूज्वरसारख्या कीटक ज्यांनी आजाराची साथ नियंत्रणासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा हिवताप कार्यालय पंढरपूर यांच्यावतीने आरोग्यसेवेचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार, सहायक संचालक, पुण्याचे डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या निर्देशनानुसार दरवर्षी जून महिन्यात हिवताप प्रतिरोध महिना राबविण्यात येत असतो.
यामध्ये पूर्ण महिनाभर कीटक ज्यांनी आजाराबाबत प्रतिबंधक अभियानाची अंमलबजावणी केली तर आपण हिवताप, डेंग्यू, मेंदूज्वर यासारख्या कीटकजन्य आजाराची साथ रोखू शकतो, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आजार होऊ नये यासाठी दररोज काळजी घ्यावी, असेही हिवताप कार्यालयाने सांगितले.
हिवताप प्रतिबंधासाठी घराशेजारील पाणीसाठे रिकामे करा,भंगार साहित्यांची विल्हेवाट लावा,कूलरमधील पाणी सतत रिकामे करा, पिण्याचे पाणी झाकून ठेवणे,खिडक्यांना सुरक्षा जाळी बसविणे,पडकी विहीर, हौदात गप्पी मासे सोडा असे आवाहन निगरीकांना करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत आठवड्यातून एक दिवस कोरडा पाणी पाण्याचे साठे रिकामे करणे ही भांडी घासून पुसून कोरडी केली जातात. घरातील सर्व पाणीसाठा कपड्याने झाकून ठेवला जातो. यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होते असे जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल यांनी सांगितले.