भूम : प्रतिनिधी
भूम-खर्डा महामार्गावर शेतक-यांनी विविध मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रामेश्वर तलावामध्ये कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात यावे, सोनगिरी साठवण तलाव कालव्यामधील शेतक-यांना २०२३ च्या रेडीरेकनर नुसार भूभाडे देण्यात यावे, भूम तालुक्यातील या अगोदर भूभाडे दिलेल्या शेतक-यांना वाढीव भूभाडे देण्यात यावे, कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी कालमर्यादा ठरवून प्रकल्प पूर्ण करण्यात यावा, यासह विविध मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलन ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी नायब तहसीलदार प्रवीण जाधव, उपसा सिंचन विभागाचे अभियंता अमृत सांगडे, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी उपस्थित होते. २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन हे विषय मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. रास्ता रोको आंदोलनात तानाजी पाटील, अमृत भोरे, अनिल भोरे, भैरट सर, विजय पाटील, दत्तात्रय चव्हाण, राहुल पाटील, महेश लावंड, गजानन सोलंकर, भरत मस्के, शरद शिंदे, ज्ञानेश्वर नरके, शिवाजी उगलमूगले, तात्या दराडे, प्रशांत गोफने, अशोक गायकवाड, मधुकर अर्जुन, विनोद वरळे, नानासाहेब लावंड, दत्तात्रय लावंड यांच्यासह वरुड, पाडोळी, सुकटा, रामेश्वर, उळूप येथील शेतकरी उपस्थित होते.