26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडारोहित ठरला सर्वाधिक षटकार ठोकणारा कर्णधार

रोहित ठरला सर्वाधिक षटकार ठोकणारा कर्णधार

कोलंबो : वृत्तसंस्था
श्रीलंकेविरुद्ध शुक्रवार, दि. २ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील पहिला कर्णधार ठरला. त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनचा विक्रम मोडित काढला.

रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ४७ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांसह ५८ धावा केल्या. सलामीला उतरताच पहिल्याच षटकात रोहितने गगनचुंबी षटकार लगावत डावाला सुरुवात केली. हा सामना बरोबरीत सुटला असला तरी कर्णधार म्हणून रोहित शर्माने एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनचा विक्रम मोडला.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितने तिसरा षटकार लगावत ही कामगिरी केली. त्याने कर्णधार म्हणून आतापर्यंत एकूण १२४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये त्याच्या नावावर २३४ षटकार आहेत. इयॉन मॉर्गन या यादीत १९८ सामन्यांत इंग्लंडचे कर्णधारपद भूषवले आणि २३३ षटकार मारले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR