26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्ररत्नागिरीला वापरूनच कोयनेचे पाणी मराठवाड्याला : सामंत

रत्नागिरीला वापरूनच कोयनेचे पाणी मराठवाड्याला : सामंत

रत्नागिरी : वृत्तसंस्था
कोयना अवजलाचा वापर कसा करावा, याबाबत पेंडसे समितीने दिलेल्या अहवालाचा तंतोतंत वापर करून मगच पाणी मराठवाड्याला दिले जाईल, अशी भूमिका उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली.

रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केले. समुद्राला जाऊन मिळणारे कोयना अवजल मराठवाड्याकडे नेण्याचा विषय काही काही काळाने चर्चेत येतो. जवळपास गेली २०-२५ वर्षे कोयना अवजलावर चर्चा होत आहे. कोयनामध्ये दरवर्षी १,९११ दशलक्ष घनमीटर इतके पाणी वीजनिर्मिती केल्यानंतर वाशिष्ठी नदीत सोडण्यात येते. वाशिष्ठी नदीतून हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. हे पाणी मराठवाड्याला, मुंबईला देण्यावर तसेच ते जिल्ह्यासाठी वापरण्यावर अनेकदा चर्चा झाली. मात्र, अजूनही त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

मंत्री सामंत म्हणाले की, १९९९ पासून कोयना अवजलाबाबत आपण अभ्यास करीत आहोत. आमदार झाल्यानंतर २००५ मध्ये याबाबत विधान परिषदेत पिटीशन दाखल केले होते. त्याला अनुसरून पेंडसे समिती नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला. या समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशींचा तंतोतंत वापर करून कोयना अवजल प्रथम रत्नागिरी जिल्ह्यासाठी वापरले जाईल आणि त्यानंतर ते मराठवाड्याला दिले जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR