26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीय१३ लाख भारतीय विद्यार्थी विदेशात, कॅनडाला पसंती

१३ लाख भारतीय विद्यार्थी विदेशात, कॅनडाला पसंती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
परदेशात शिक्षण घेणा-या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. १३ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत.

परदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांची आकडेवारी सरकार ठेवते का, असा प्रश्न कीर्तीवर्धन स्ािंह यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी सांगितले की, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, स्ािंगापूर, रशिया, इस्रायल आणि युक्रेनसह १०८ देशांमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती दिली.

सध्या १३,३५,८७८ भारतीय विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. २०२३ मध्ये हा आकडा १३,१८,९५५ होता, तर २०२२ मध्ये हा आकडा ९,०७,४०४ होता. कीर्तीवर्धन स्ािंह म्हणाले की, चालू वर्षात १३,३५,८७८ भारतीय विद्यार्थ्यांपैकी कॅनडात ४,२७,०००, अमेरिकेत ३,३७,६३०, चीनमध्ये ८५८०, ग्रीसमध्ये ८ , इस्रायलमध्ये ९००, पाकिस्तानात १४ आणि युक्रेनमध्ये २५१० विद्यार्थी शिकत आहेत.

याशिवाय किर्तीवर्धन सिंह म्हणाले की, भारत सरकार व्हिसा फ्री एंट्री ट्रॅव्हल, व्हिसा ऑन अरायव्हल यासारख्या सुविधा देऊ शकतील अशा देशांची संख्या वाढवण्यासाठी भारतीयांना जगभरातील प्रवास सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याचबरोबर, परदेशात भारतीय मिशन/पोस्ट नियमितपणे परदेशात शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क साधतात आणि त्यांना त्यांच्याकडे किंवा ग्लोबल रिश्ता पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करतात, असे कीर्तीवर्धन स्ािंह म्हणाले.

भारतीय मिशन/पोस्टद्वारे प्रथमच परदेशात जाणा-या भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ आयोजित केले जाते. त्यांच्याकडून यजमान देशांमधील सुरक्षा समस्यांबद्दल माहिती दिली जाते. याशिवाय, विद्यार्थ्यांना भारतीय मिशन/पोस्टमध्ये नोंदणी करण्यासाठी आणि नियमितपणे कनेक्ट राहण्यासाठी सल्ला दिला जातो. तसेच, भारतीय मिशन्स/पोस्ट्स वरील पद्धतीचा वापर स्वैच्छिक नोंदणीद्वारे परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांचा डेटा गोळा करण्यासाठी करतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR