24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रसदनिका प्रकल्पात घोटाळा, सोमय्या यांचा नवा आरोप

सदनिका प्रकल्पात घोटाळा, सोमय्या यांचा नवा आरोप

मुंबई : प्रतिनिधी
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील सदनिका प्रकरण बाहेर काढले आहे. ३५ हजार सदनिकांच्या प्रकल्पात २० हजार कोटींच्या घोटाळ््याचे कारस्थान रचल्याचे सांगत कोर्टात याचिका दाखल केल्याचे सोमय्यांनी स्पष्ट केले.

किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे सरकारने मार्च २०२२ मध्ये मुंबईत ३५ हजार प्रकल्पग्रस्त सदनिका बनविण्यासाठी कंत्राट काढले. शाहिद बलबा आणि अतुल चोरडिया या बिल्डरांना ६ कंत्राट दिले. त्यातला एक प्रकल्प मुलुंड पूर्व केळकर कॉलेजजवळ, दुसरा कांजुरमार्ग इथे चांदणी बोरी इथे होणार होता तर प्रभादेवी इथे आणि जुहू मालाड इथे असे प्लान होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून बिल्डर लोकांनी २० हजार कोटी लुटण्याचे कारस्थान रचले होते. याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात सोमय्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलुंडचा प्रकल्प थांबवावा, उद्धव ठाकरे यांचे कटकारस्थान थांबवावे लागणार आहे. मी या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारलाही प्रतिवादी म्हणून नमूद केले आहे. सर्व घोटाळ््यांवर इक्बाल चहल यांच्या सह्या आहेत. याची चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरून बाजूला करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR