26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरसूर्यवंशी व टेकाळेस सोमवारी न्यायालयासमोर हजर करणार

सूर्यवंशी व टेकाळेस सोमवारी न्यायालयासमोर हजर करणार

लातूर : प्रतिनिधी
माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर हे अध्यक्ष असलेल्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा (जेएसपीएम) संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात इयत्ता ७ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या १३ वर्षीय अरविंद खोपे नामक मुलाचा संस्थेच्या वसतिगृहात संशयास्पद मृत्यूच्या घटनेत पोलिसांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने दि. ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी मुदत संपत असल्याने एमआएडीसी पोलिस आज परत त्यांना न्यायालयासमोर हजर करून आपली बाजू मांडणार असून या पाच दिवसांच्या कोठडीत या प्रकरणी काय उलगडा झाला, याचे चित्रही समोर येणार आहे.

जेएसपीएम संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद खोपे या अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, दि. २९ जुलैच्या रात्री घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या वसतिगृह व्यवसथापक विठ्ठल सूर्यवंशी व विनायक टेकाळे यांनी अरविंदच्या मृत्यूचा पुरावा नष्ट केल्या प्रकरणी गजाआड केले आहे. या आरोपींना न्यायालयाने दि. ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या पोलिस कोठडीत त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न कोणाच्या सल्ल्याावरून किंवा सांगण्यावरून केला का? याची चौकशी पोलिसांकडून केली जात असल्याचे समजत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR