नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि पॉलिश्ड हि-यांना मागणी नसल्यामुळे सूरत येथील डायमंड कंपनी किरण जेम्सने आपल्या ५० हजार कर्मचा-यांना १० दिवसांची सुटी जाहीर केली आहे.
कंपनीने कर्मचा-यांना १७ ऑगस्ट ते २७ ऑगस्टपर्यंत सुटी दिल्याचे सांगितले आहे. ही कंपनी जगातील सर्वांत मोठी नैसर्गिक हिरे उत्पादक कंपनी असल्याचे त्यांच्या वेबसाईटवरून समजते.
किरण जेम्सचे अध्यक्ष वल्लभभाई लखानी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आम्ही आमच्या ५० हजार कर्मचा-यांसाठी १० दिवसांची रजा जाहीर केली आहे. आम्ही काही रक्कम कपात करणार असलो तरी, सर्व कर्मचा-यांना या कालावधीसाठी पगार दिला जाणार आहे. मंदीमुळे आम्ही कंटाळलो आहोत, त्यामुळे आम्हाला ही सुटी जाहीर करणे भाग पडले आहे.