26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूरगुळपोळीत रास्ता रोको आंदोलन

गुळपोळीत रास्ता रोको आंदोलन

पिकांचे पंचनामे करून मदत देण्याची शेतक-यांची मागणी

बार्शी : बार्शी तालुक्यातील सर्व पिकांचे पंचनामे करून शेतक-यांना तात्काळ मदत द्यावी, या मागणीसाठी तालुक्यातील गुळपोळी येथे भैरवनाथ शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील सर्व मंडळातील सर्व पिके सततच्या पावसामुळे पिवळी पडली आहेत. आठ दिवसात पंचनामे करून तत्काळ शेतक-यांना मदत द्यावी, एनडीआरएफ किंवा एसडीडीआरएफ मधून तात्काळ शेतक-यांना मदत मिळावी यासाठी हे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आठ दिवसांत पंचनामे करून मदत न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे उपोषण करण्याचा इशारा चिकणे यांनी यावेळी दिला. तालुक्यात सतत पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे व सर्व पिके पाण्यात गेली आहेत व द्राक्षे बागेला मुळ्या आल्या आहेत, द्राक्षे बागेला मुळ्या आल्याने फळ धारणा होत नाही व सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. जनहित शेतकरी संघटनेचे तालुका संघटक रवींद्र मुठाळ व शेतकरी संघटनेचे रामराव काटे यांनीही तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी केली. मागण्यांचे निवेदन प्रभारी मंडल अधिकारी शिंदे व कृषी सहायक जगदाळे यांनी स्विकारले.

शहाजी चिकणे, परशुराम पाटील, कृष्णाथ चिकणे, विशाल चिकणे, गोपाळ काळे, दत्तात्रय गुरव, अशोक चिकणे, चांद शेख, ईलाई शेख, प्रशांत गणेश चिकणे आदी शेतकरी रास्ता रोको आंदोलनास उपस्थित होते. बार्शी तालुक्यातील पिकांच्या नुकसानीबाबत मदत मिळावी म्हणून संघटनेच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करण्यात आला. मात्र, प्रशासनाने मागणीची दखल घेतली नाही. मदत त्वरीत न मिळाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR