मोहोळ : निसर्गोपचार पद्धती ही अतिप्राचीन व सर्वश्रेष्ठ विनाऔषध पद्धती असून जुन्यातला जुना आजार बरा करण्यासाठी देखील ही पद्धती उपयुक्त आहे. या पद्धतीत मसाज, व्यायाम, आयुर्वेद, न्युट्रिशन, होमिओपॅथी, हायड्रोथेरपी अशा अनेक प्रकारच्या पर्यायी पद्धतीचा ही र समावेश असल्याचे डॉ. मुकुंद लिमये यांनी सांगितले.
न्यू इंग्लिश स्कुल कुरूल (ता. मोहोळ) येथे सोलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ लिमये यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक जे. पी. मदने, श्री डी. एस. जाधव,व्ही एन. नागणे, एन.आर. खरात, एम. एस. माने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. आर. खरात यांनी केले तर आभार व्ही. एन. नागणे यांनी मानले.