25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeपरभणीघनकचरा व्यवस्थापनासाठी शेतक-यांचा उपोषणाचा इशारा

घनकचरा व्यवस्थापनासाठी शेतक-यांचा उपोषणाचा इशारा

पालम : शहरापासून जवळच असलेल्या कोळवाडी रस्त्या लगतच्या गायरान जमिनीवर पालम शहरातील घनकचरा टाकण्यात येत आहे. यामुळे परीसरातील शेतक-यांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी मोकाट कुत्रे धुडगूस घालत असून शेतक-यांच्या अंगावर धावून जाण्यासह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या कच-याचे तात्काळ व्यवस्थापन करावे अशी मागणी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा या विरोधात उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पालम तालूक्यातील मागासवर्गीय लोक गायरान जमिनी कसून आपली उपजिकविका भागवत असतात. परंतु मागील अनेक दिवसापासून पालम नगरपंचायत घनकचरा टाकत आहे. या संदर्भात लेखी व तोंडी तक्रार करूनही मुख्य कार्यकारी अधिकारी यानी कुठलीच उपाय योजना केली नाही. यामुळे परीसरात दुर्गंधी पसरली असून मोकाट कूत्रे शेतक-यावर हल्ला करत आहेत. या संदर्भात त्रस्त शेतक-यांनी तहसिलदार वाघमारे यांना निवेदन दिले असून घनकचरा व्यवस्थापन करावे अन्यथा या विरोधात दि. १३ ऑगस्ट रोजी उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनावर शेतकरी संदीप हत्तीअंबीरे, रावसाहेब व्हावळे, राजु व्हावळे राष्ट्रपाल हानवते, भगवान हत्तीअंबीरे, अरविंद व्हावळे, बबन हानवते, संतोष हत्तीअंबीरे, रमेश थिट्टे, लक्ष्मण थिट्टे, भगवान थिट्टे आदीच्या स्वाक्षरी आहेत. पालम शहरातील घनकचरा टाकण्याची जागा अधिकृत का अनधिकृत या संदर्भातील माहीती विचारण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष लोमटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी फोन उचलत नसून माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. कधी पेठपिपळगाव रस्ता तर कधी कोळवाडी रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने नेमकी कोणती जागा अधिकृत याचा ताळमेळ लागत नसल्याचे दिसून येते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR