बीड : बीड जिल्ह्यात रेल्वे धावावी, बीडच्या नागरिकांनाही मुंबईपर्यंत रेल्वेने प्रवास करता यावा, हे स्वप्न दिवंगत भाजप नेते आणि माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी पाहिले होते. आता ते स्वप्न सत्यात उतरत आहे.
बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ््याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे. अमळनेर ते विघनवाडी नवीन रेल्वे लोहमार्गाची आज चाचणी घेण्यात आली. शिरूर कासार तालुक्यात विघनवाडीला रेल्वेचे आज आगमन झाले.
कुतूहलापोटी स्टेशनवर रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच रेल्वे आणि रेल्वे कर्मचा-यांचे तालुकावासीयातर्फे नागरिकांनी मोटारमनचे स्वागत केले. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात असलेल्या व बिडपासून ३० किलोमीटर असलेली विघनवाडीपर्यंतच्या रेल्वेचे काम पूर्ण झाले व शुक्रवारी रेल्वे धावल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत चाचणी रेल्वेचे स्वागत केले.