कोलकाता : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि विद्यार्थी सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची मॅजिस्ट्रेट चौकशीची मागणी करत ज्युनिअर डॉक्टर, इंटर्न आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींनी सलग चौथ्या दिवशी संप सुरूच ठेवला आहे.
त्यामुळे आज राज्यभरातील रुग्णालय सेवा विस्कळीत झाली आहे. दुसरीकडे, ही भीषण घटना घडलेल्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्राचार्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राचार्य, प्राध्यापक डॉ संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सोशल मीडियावर माझी बदनामी केली जात आहे. माज्याबद्दल काहीही बोलले जात आहे. मृत डॉक्टर माज्या मुलीप्रमाणे होते.
पालक म्हणून मी राजीनामा देत आहे. भविष्यात असे कोणाशीही घडणे मला आवडत नाही, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, लालबाजारमधील कोलकाता पोलिस मुख्यालयाने तीन कनिष्ठ डॉक्टर आणि एका हाऊसकीपिंग स्टाफला चौकशीला बोलावले आहे. घटनेच्या रात्री हे लोक ड्युटीवर होते. यामुळे पोलीस त्यांची चौकशी करणार आहेत.