27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रअजित पवारांच्या कार्यक्रमात मुस्लिम महिलांच्या गुलाबी हिजाबची चर्चा!

अजित पवारांच्या कार्यक्रमात मुस्लिम महिलांच्या गुलाबी हिजाबची चर्चा!

धुळे : अजित पवार अन् गुलाबी रंग हे समीकरण सध्या चर्चेत आहे. अजित पवार सध्या जनसन्मान यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. या दौ-यात आणि दौरा सुरू होण्यापूर्वीच अजितदादा हे गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान करत आहेत. त्यांच्या या जॅकेटची खूपच चर्चा झाली होती. त्यानंतर अद्यापही अजित पवार हे जॅकेट परिधान करत आहेत. पण आज धुळ्यात झालेल्या मेळाव्यात चक्क मुस्लिम महिलांनी गुलाबी रंगाचे हिजाब घातल्याने हा विषय चर्चेत राहिला आहे.

अजित पवार सध्या धुळ्याच्या दौ-यावर आहेत. धुळ्यातील मारीया हॉलमध्ये राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केले. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे अजित पवार ज्या व्यासपीठावरून बोलत होते, ते व्यासपीठ गुलाबीमय झालं होतं. कारण या ठिकाणी लावण्यात आलेले कार्यक्रमाचे फ्लेक्स, पोडियम तसेच केवळ अजित पवारांनी परिधान केलेले गुलाबी जॅकेट हे ठळकपणे दिसत होते.

त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. या महिलांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गुलाबी रंगाचा हिजाब घातला होता. त्यामुळे परिसरात सगळीकडे या गुलाबी हिजाबची चर्चा रंगली होती. या कार्यक्रमाचा व्हीडीओ देखील समोर आला आहे. यामध्ये अजित पवारांचे भाषण सुरू असताना हिजाब परिधान केलेल्या अनेक महिला पुढे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दिसल्या.

दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. या योजनेला महिला वर्गाचा तुफान प्रतिसाद मिळाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली ही योजना सरकारसाठी वरदान ठरते का? हे पाहावं लागणार आहे. कारण महिलांसाठी सरकार काम करतंय हा संदेश याद्वारे सरकारला द्यायचा आहे.

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला होता. भाजप आणि शिवसेनेसोबत युती म्हणून एकत्र आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. पण महिलांना भाजपातल्या अनेक मंत्र्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हे बोलून दाखवलं आहे, की अजितदादांना सोबत घेऊ नका. याची परिणती म्हणजे अजित पवारांपासून मुस्लिम समाज दुरावला होता. त्यामुळे या मुस्लिम महिलांना प्रतिकात्मरीत्या गुलाबी रंग देऊन संबोधन करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR