नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्चने मागील वर्षी अदानी समुहाविरोधात आरोप केले होते. या आरोपानंतर शेअर मार्केटमध्ये गोंधळ सुरू झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केले आहेत. आता त्यांनी सेबी प्रमुख माधबी पुरी बुच आणि अदानी समूहाविरुद्धच्या नवीन अहवालावरून सत्ताधारी आणि विरोधकांत गदारोळ सुरू असून भाजप आणि इंडिया आघाडीत शाब्दिक वार होत आहेत. मात्र, सेबी प्रमुखांनी यावर स्पष्टीकरण देत ते निराधार असल्याचे म्हटले आहे.दरम्यान, आता भाजपने ंिहडेनबर्ग रिसर्च आणि इंडिया आघाडीवरही हल्लाबोल केला आहे.
या अहवालावरून आता भाजपाने हिंडेनबर्ग रिसर्चला धारेवर धरले आहे. भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी विरोधकांवरही आरोप केले. हे सर्व देशाविरुद्धचे षड्यंत्र आहे. तिस-यांदा पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडीचे लोक आणि त्यांना प्रोत्साहन देणारे टूल किटचे लोक भारताला आर्थिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा कट रचत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
भाजपा नेते रविशंकर म्हणाले की, सोमवारी शेअर मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण होण्यासाठी ंिहडेनबर्ग अहवाल शनिवारी प्रसिद्ध केला जातो. रविवारी त्या अहवालावर गोंधळ निर्माण केला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीतील तपास पूर्ण केल्यानंतर सेबीने जुलैमध्ये हिंडेनबर्गविरुद्ध नोटीस जारी केली होती. आपल्या बचावात उत्तर देण्याऐवजी हिंडेनबर्ग यांनी हा अहवाल सादर केला असून तो पूर्णपणे निराधार आहे, असेही भाजपा नेते म्हणाले.
आरोप सेबी प्रमुखांना मान्य?
हिंडेनबर्गने सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर माधबी पुरी आणि सेबीनेही त्यावर प्रतिक्रिया देत हे आरोप हे आरोप निराधार आणि चारित्र्यहनन करणारे असल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे अदानी समूहानेही हे आरोप फेटाळून लावले होते. परंतु यानंतर हिंडेनबर्गने पुन्हा एकदा माधबी पुरी बुच यांच्यावर निशाणा साधला. आमच्या ताज्या अहवालात केलेले आरोप सेबी प्रमुखांनी काही प्रमाणात मान्य केले आहेत असा दावा त्यांनी केला आहे.
रिपोर्टवर कारवाई नाही?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हिंडेनबर्गने हा दावा करत पुन्हा एकदा निशाणा साधला. सेबी प्रमुखांची गुंतवणूक अदानींशी संबंधित कंपन्यांमध्ये असल्याने सेबीने अदानी समूहाच्या रिपोर्टवर कारवाई करण्याचा करण्याची इच्छा व्यक्त केली नाही असे या अहवालात म्हटले आहे.