सोलापूर : प्रतिनिधी
जीवनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर जे यश मिळत जाते त्यावेळेस आपल्या माणसांकडून किंवा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाकडून दिलेल्या कौतुकाचे थाप ही भविष्यातील यशाचे शिखर गाठण्यासाठी ऊर्जा स्तोत्र ठरते असे प्रतिपादन मनीषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केले.
जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एक च्या वतीने दहावी ,बारावी गुणवंत विद्यार्थी ७५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले पालकांसह करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र रोख रक्कम, पुस्तक, आयुर्वेदिक रोप,व तिरंगा चिन्ह देऊन सन्मानित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथील हॉलमध्ये करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश अधिक उजळून दिसतं त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांनी न डगमगता आपण निवडलेल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठावे.आपल्या स्वतःची व त्याचबरोबर आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून देशसेवा करावे असे आवाहन याप्रसंगी आव्हाळे यांनी केले.
सुधीर ठोंबरे प्रकल्प संचालक यांनी विद्यार्थ्यांनी जे यश मिळवले त्या यशामध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचे आहे आणि निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी व्हावे असा शुभेच्छा दिल्या. मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी स्पर्धा परीक्षेकडे जात असताना कष्ट ,चिकाटी आणि आत्मविश्वास असणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे उपस्थित होते.याप्रसंगी दहावीतील ३० व बारावीच्या १२ विद्यार्थ्यांना सन्मान करण्यात आले. विद्यार्थ्यांमधून प्रांजली मुसळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक चेअरमन विवेक लिंगराज सूत्रसंचालन डॉ. एस. पी माने यांनी तर आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन सुहास चेळेकर यांनी केले.कार्यक्रमास मावळते संचालक श्रीशैल देशमुख, दत्तात्रय घोडके, दीपक घाडगे, सुंदर नागटिळक ,शेखर जाधव, हरिबा सपताळे, त्रिमूर्ती राऊत, धन्यकुमार राठोड, अनिल जगताप,सुनंदा यादगीर , नूतन संचालक विष्णू पाटील ,शहाजान तांबोळी, सुरेश कुंभार, श्रीधर कलशेट्टी, विशाल घोगरे, तजमुल मुतवली, गजानन मारडकर शिवानंद म्हमाने, किरण लालबोंद्रे, विकास शिंदे, चेतन वाघमारे, शिवाजी राठोड, विजयसिंह घेरडे, मृणालिनी शिंदे, श्वेतांबरी राऊत आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम पार सचिव दत्तात्रय देशपांडे, अशोक पवार, सुभाष काळे ,विनोद कदम ,जगदेवी अंजनलकर आदींनी परिश्रम घेतले.