23.2 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरखलंग्री येथील ग्रामस्थांनी लावले शाळेला कुलूप

खलंग्री येथील ग्रामस्थांनी लावले शाळेला कुलूप

रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील खलंग्री येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा असून शाळेमध्ये तीन पदवीधर शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सरपंच, उपसरपंच, शाळा समिती सदस्यांनी वारंवार निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी े शाळेच्या कार्यालयाला कुलूप  ठोकून जोपर्यंत शिक्षक देणार नाहीत तोपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नाहीत, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे .
तालुक्यातील जि.प.के.प्रा.शा. खलंग्री  येथे इ. १ ली ते ७  वी पर्यंत चे  वर्ग असुन पटसंख्या १०२  इतकी आहे. सध्या येथील  प्राथमीक शक्षिकांची ३  मान्यपदापैकी ३ कार्यरत पदे आहेत, प्राथमीक पदविधरांची २ पदे मान्य असुन १  पद (भाषा) कार्यरत आहे व एक पद (गणित वज्ञिान) रिक्त आहे. त्याप्रमाणे ग्रेडच्या मुख्याध्यापकाचे पद मान्य असून ते पदही रिक्त आहे, सध्या शाळेत एकूण ६  पदापैकी ४ पदे कार्यरत आहेत व दोन रिक्त पदे असल्यामुळे शाळेच्या प्रशासनास अडचण होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत असल्याने या शाळेतून विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये म्हणून  पालक व विद्यार्थी या  शाळेतून टि .सी काढत आहेत व टि .सीची मागणी करीत आहेत. अगोदरच जि प. शाळेकडे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास तयार होत नाहीत. जेथे  विद्यार्थी आहेत तेथे शिक्षक नसल्याने शिक्षकांच्या मागणीसाठी वारंवार निवेदन  देऊनही कार्यवाही होत नसल्याने सोमवारी दि. १२ रोजी सकाळी ग्रामस्थाच्या वतीने शाळेला कुलूप ठोकून पद मान्यता असलेले शिक्षक जोपर्यंत  शाळेत येणार नाहीत तोपर्यंत  आपल्या पाल्याला शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR