26.9 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमोहम्मद युनूस यांनी खरे ठरविले शरद पवारांचे शब्द

मोहम्मद युनूस यांनी खरे ठरविले शरद पवारांचे शब्द

मोहम्मद युनूस पोहचले ढाकेश्वरी मंदिरात

ढाका : बांगला देशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस आणि शरद पवारांचे चांगले संबंध आहेत. पुण्यातील पत्रकारांशी बोलताना पवारांनी मोहम्मद युनूस स्वत: पक्के सेक्यूलर आहेत. ते कधीही समाजामध्ये, भाषिकांमध्ये तसेच धर्मियांमध्ये अंतर वाढावे असे काम करणार नाहीत असे कौतुक केले होते. त्यानंतर दुस-याच दिवशी याची प्रचिती बांगला देशात पाहायला मिळाली.

बांगला देशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे मंगळवारी ढाकेश्वरी मंदिरात पोहचले. त्याठिकाणी हिंदू समुदायातील लोकांसोबत युनूस यांनी संवाद साधला. यावेळी अल्पसंख्याकांचे ५ सदस्यीय शिष्टमंडळ युनूस यांना भेटले. त्यात ८ प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या. बांगला देशात गेल्या काही दिवसांत हिंदू समुदायावरील हल्ल्याच्या बातम्या समोर येत आहेत अशावेळी युनूस यांनी केलेला दौरा महत्त्वाचा ठरतो.

मोहम्मद युनूस यांनी ढाकेश्वरी मंदिरातून लोकांना संबोधित केले. ते म्हणाले की, देशात संकटाची स्थिती असताना त्यातून बाहेर पडण्यासाठी लोकांमध्ये फूट नव्हे तर एकजूट करायला हवी. या आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनी धैर्याने सोबत राहायला हवे. आपल्याला असा बांगला देश घडवायचा आहे जे एका कुटुंबासारखे हवे. कुटुंबात मतभेद, भांडणाचा प्रश्न येत नाही. आपण सर्वच बांगला देशी आहोत. बांगलादेशात शांतता नांदावी यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे त्यांनी म्हटले. त्याशिवाय लोकांनी धर्म आणि जातीच्या आधारे भेदभाव न करता देशातील सर्वांसाठी एक कायदा आणि एक संविधान असायला हवे असेही भाष्य त्यांनी केले.

काय म्हणाले होते शरद पवार?
मोहम्मद युनूस बारामतीत आले होते. बांगला देशातील परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला होता. त्यावर माझ्या माहितीप्रमाणे मोहम्मद युनूस स्वत: पक्के सेक्यूलर आहेत. ते कधीही समाजामध्ये, भाषिकांमध्ये तसेच धर्मियांमध्ये अंतर वाढावे, असे काम करणार नाहीत. त्यामुळे बॅलेन्स भूमिका घेणा-या नेतृत्वाची बांगलादेशला गरज होती. तेथील परिस्थिती ते सुधारणा आणू शकतील. भारत सरकारने बांगला देशमधील परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR