मुंबई : प्रतिनिधी
मुंबईमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका १६ वर्षीय मुलाने ३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. घटना साकीनाका भागात घडली आहे.मुलीची वैद्यकीय तपासणी सुरू असून तिच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत तक्रार दाखली केली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय मुलाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा अल्पवयीन मुलगा नववीत शिकत आहे. पीडित मुलीचं कुटुंब साधारण१५ दिवसांपूर्वी सोलापूरमधून मुंबईत आले आहे. पीडित मुलीची आवश्यक आरोग्य तपासणी राजवाडी हॉस्पिटलमध्ये केली जात आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
पीडित मुलीच्या आरोग्य तपासणीनंतर आणि पोलिस तपासानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होईल. मात्र, घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.