छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
चातुर्मास सुरू झाला की सर्व सणावारांना सुरुवात होते. सणवार म्हटले की, प्रत्येक गोष्टींचे म्हणजे डाळीचे, साखरेचे भाव हे वाढतात. यातच आता साखर आणि चणाडाळीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान,
सध्या चणाडाळ आणि साखरेला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी येत आहे. सणवारात पुरण करण्यासाठी आणि स्वयंपाकामध्ये इतरही गोष्टींमध्ये चणाडाळ मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यात येते. त्यामुळे मागणी जास्त असल्याने चणाडाळ आणि साखरेच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सध्या चणा डाळीचे भाव हे क्विंटलमागे ९०० ते ९५० रुपयांनी वाढले आहेत. आधी चणाडाळ ही ६८ ते ७० रुपये होती. पण आता हीच डाळ ८५ ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.
सध्या साखरेलाही मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आली आहे.३ ते ४ पटीने साखरेची मागणी वाढली आहे. यामुळे साखरेच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साखरेच्या भावात २०० ते २५० रुपयांची भाववाढ झाली आहे. आधी साखरेचे दर प्रतिक्विंटल ३९०० रुपये होते. आता ४१०० ते ४१५० या दराने विकली जात आहे.
अजून दर वाढ होण्याची शक्यता
दरम्यान, येत्या काळात साखर आणि चणाडाळीला अजून जास्त प्रमाणात मागणी येणार आहे. त्यामुळे येणा-या काळामध्ये यांचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ही भाववाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.