टोकियो : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पुढील महिन्यात पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. यासोबतच ते सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) च्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाहीत आणि पुढच्या महिन्यात नवीन अध्यक्ष निवडल्यानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील. स्व:ता पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहीती दिली.
जपानचा सत्ताधारी पक्ष एलडीपी सध्या वादात आहे. यासोबतच युनिफिकेशन चर्चसोबतच्या संबंधांबद्दलच्या खुलाशांमुळे आणि गेल्या वर्षी राजकीय निधीबाबतच्या वादामुळे, पक्ष नकारात्मक कारणांमुळे चर्चेत आहे. यामुळेच काशिद यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.