22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयकेजरीवाल यांची ‘सर्वोच्च’ निराशा

केजरीवाल यांची ‘सर्वोच्च’ निराशा

सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी २३ ऑगस्टला

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर विचार करण्यास नकार दिला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान,त्यांनी सीबीआयच्या अटकेला आव्हान दिले असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणेला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. सिंघवी म्हणाले की, केजरीवाल यांना ईडीच्या प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रकृतीचे कारण सांगून त्यांनी तात्काळ अंतरिम जामीन देण्याची मागणी केली, जी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली. यावेळी आपण अंतरिम जामिनाचा विचार करणार नसल्याचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले.

केजरीवाल यांचे आव्हान
सीबीआयने मद्य धोरण प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात सीएम केजरीवाल यांनी आपल्या अटकेला आव्हान दिले आहे. त्यांनी कोर्टाकडे जामिनासाठी विनंतीही केली होती. या प्रकरणी जामिनाची विनंती करणा-या केजरीवाल यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट स्वतंत्रपणे सुनावणी करत आहे. केजरीवाल यांच्या दोन्ही याचिकांवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR