मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारवर बदल्यांमधील भ्रष्टाचाराच्या आरोपावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नाराजी व्यक्त केली आहे. बदल्यांमुळे महायुती सरकारची प्रतिमा डागाळत असल्याची भावना संघाने व्यक्त केली आहे.
भाजपच्या मंत्र्यांनी बदल्यांमधील भ्रष्टाचारापासून दूर राहावे, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे. विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर संघ आणि भाजपमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे.
विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर संघ आणि भाजपमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. तसेच विशेषत: विदर्भात संघ आणि भाजपमध्ये समन्वय राहायला हवा असे संघाने म्हटले आहे. भाजपमधील मराठा, ओबीसी, दलित समाजातील नेत्यांना जबाबदारी वाटून देऊन त्यानुसार नियोजन करण्यात यावे अशी भूमिका संघाने घेतली आहे.