22.3 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरमाही आरदवाड तलवारबाजीत देशातून िद्तीय

माही आरदवाड तलवारबाजीत देशातून िद्तीय

अहमदपूर : प्रतिनिधी
दि. २० ते २४ नोव्हेंबर जम्मू कश्मीर येथे ६७ व्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धा पार पडल्या. यास्पर्धेत माही आरदवाड हिने सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई करीत देशातून सर्व द्वितीय येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. या स्पर्धेत लातूर तलवारबाजी संघटनेची माही किशोर आरदवाड या खेळाडूने १९ वर्षा खालील गटात इप्पी सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. इप्पी वैयक्तीक प्रकारात रौप्य पदक प्राप्त करत भारतातून सर्व द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे. यामुळे तिची खेलो इंडियाच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे . माही आरदवाड ही सध्या महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय अहमदपूर येथे शिक्षण घेत आहे. या यशासाठी तिला श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते दत्ता गलाले, वजीरोद्दीन काझी, मोहसीन शेख, रोहित गलाले आकाश बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य काबरा बी.आर., जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अभिजीत मोरे, अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयाचे मु.अ. प्रशांत माने, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुनील चलवदे , सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलचे संचालक कुलदीप हाके, प्रा. अनिल चवळे , वैभव कज्जेवाड तसेच अहमदपूरच्या सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांनी अभिनंदन करून खेलो इंडियाच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा.दत्ता गलाले यांच्या मुख्य व महत्त्वाचे मार्गदर्शनाखाली तलवारबाजीमध्ये माही आरदवाडने लातूर विभागाचे व महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर उंचावल्याने सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR