26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रधबधब्यावर स्टंटबाजी करणे पडले महागात, एकाचा मृत्यू

धबधब्यावर स्टंटबाजी करणे पडले महागात, एकाचा मृत्यू

नागपूर : १५ ऑगस्ट रोजी नागपूरमधील उमरखेड येथील मकरधोकड धबधब्यावर एक दुर्दैवी घटना घडली. धबधब्याच्या सांडव्यावर एका तरुणाचा पाण्यात बूडून मृत्यू झाला. मृत्यू झालेला तरुण आपल्या मित्रांसोबत मकरधोकड धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता.

त्यावेळीस त्याने मित्रांसोबत स्टंटबाजी करण्याचे ठरवले. मित्रांसोबत स्टंटबाजी करत असताना तो सांडव्याच्या भिंतीवर चढला आणि भिंतीवर उभा राहून स्टंटबाजी करू लागला असताना काही क्षणातच त्याचा पाय घसरला आणि धबधब्याच्या दुस-या बाजूला पडला, यात त्याचा मृत्यू झाला. धबधब्यावर पाण्याचा प्रवाह खूप होता.

या घटनेचा व्हीडीओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पर्यटकाने आपल्या फोनमध्ये शूट केला आहे. तरुण पाण्यात पडल्याने धबधब्यावर फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सध्या धबधब्यावर वातावरणाचा आनंद लुटण्याठी ठिकठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे. अशातच या घटनेनंतर पर्यटकांनी स्वत:ची काळजी घेणे आणि जीव धोक्यात जाईल असे कोणतेही कृत्य करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR