17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeक्रीडासुरक्षेमुळे ड्युरंड कप फुटबॉल सामना रद्द

सुरक्षेमुळे ड्युरंड कप फुटबॉल सामना रद्द

कोलकाता : ३१ वर्षीय महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून झालेल्या गदारोळात कोलकाता पोलिसांनी आज होणा-या ड्युरंड कप फुटबॉल सामन्यादरम्यान सुरक्षा पुरवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आज होणारा ड्युरंड कप फुटबॉल सामना रद्द करण्यात आला आहे. ड्युरंड चषक समितीच्या अधिका-यांनी सामना खेळणा-या दोन्ही संघांना आणि संबंधित अधिका-यांना याची माहिती दिली आहे. मात्र यामुळे कोलकाता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गहन प्रश्न उपस्थित झाले आहेत. फुटबॉल सामन्याला सुरक्षा न दिल्याने भाजपने पश्चिम बंगाल सरकारला कोंडित पकडले आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी आज एक निवेदन जारी केले आहे. त्यात पूनावाला म्हणाले की, जे पश्चिम बंगाल सरकार एका स्टेडियमला सुरक्षा देऊ शकत नाही, ते संपूर्ण राज्याला सुरक्षा कशी देऊ शकते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भीती वाटत होती की लोक फुटबॉल सामन्यादरम्यान डॉक्टरांच्या बलात्कार आणि हत्येचा निषेध करतील, असा आरोप भाजप नेत्याने केला. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी ज्यांना त्यांच्याविरोधातील पोस्टरही सहन होत नाही, त्यांना स्टेडियममध्ये त्यांचा विरोध मान्य नाही, त्यामुळेच लोकांचा हा संभाव्य विरोध लक्षात घेऊन फुटबॉलचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

ममता बॅनर्जी सरकारची प्रतिमा डागाळली
दरम्यान, या घटनेवर ज्या पद्धतीने लोकांचा संताप उफाळून आला आहे आणि ज्या पातळीवर त्यावर टीका होत आहे, त्यामुळे ममता बॅनर्जी सरकारची प्रतिमा डागाळली आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन विरोधी पक्ष ममता सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR