27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रबदलापूरमध्ये आंदोलनातील ३०० जणांवर गुन्हे दाखल

बदलापूरमध्ये आंदोलनातील ३०० जणांवर गुन्हे दाखल

बदलापूर : प्रतिनिधी
बदलापूरमधील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे बदलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.या घटनेच्याविरोधात निदर्शने करणा-या ३०० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ४० हून अधिक जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान,ह्याटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जवळपास आठ तास रेल्वे ट्रॅक रोखून धरला होता. तर काही आंदोलकांनी शाळेत घुसून शाळेची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून आंदोलन मोडीत काढले. सध्या बदलापुरात तणावपूर्व शांतता आहे. बदलापुरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, अद्याप जमावबंदी लागू आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

दरम्यान
बदलापुरात मंगळवारी झालेल्या तीव्र आंदोलनानंतर आज तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आंदोलन झाल्यानंतर आज रेल्वे वाहतुकीबाबत बोलताना अधिका-यांनी सांगितले की, परिस्थिती सामान्य आहे. अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा काही दिवस बंद राहणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी शाळेच्या स्वच्छतागृहात बालवाडीच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. ही घटना १६ ऑगस्ट रोजी एका मुलीने आपल्या पालकांना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी अक्षय शिंदे याला १७ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.

आरोपीच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ

दरम्यान, लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने आरोपीच्या पोलिस कोठडीत ४ दिवसांची वाढ केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR