वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेच्या अधिका-यांनी कॉग्निजेंट घोटाळ्याप्रकरणी एल अँड टीचे प्रमुख एस. एन. सुब्रमण्यन यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यासोबत इतर चार जणांनाही हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॉग्निजेंट घोटाळा प्रकरणात या सर्वांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.
कॉग्निजेंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्सने २०१३ ते २०१५ दरम्यान भारतातील सर्वात मोठ्या बांधकाम कंपनीच्या माध्यमातून सरकारी अधिका-यांना लाच दिली की नाही? याचा तपास करण्यासाठी सुब्रमण्यन यांना जबाब देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्याच्या जवळ तयार होत असलेल्या एका कॅम्पससाठी पर्यावरण आणि इतर क्लिअरन्स हवे होते, त्यासाठी लाच देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्या संदर्भातच अमेरिकेच्या अधिका-यांना या कंपनीच्या प्रमुखांचा जबाब नोंदवायचा आहे.
एस. एन. सुब्रमण्यन लार्सन अँड टुब्रोचे प्रमुख होते. यावेळी कॉग्निजेंट टेक्नॉलॉजीवर परमिट घेण्यासाठी लाच दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याची चौकशी सुरू आहे. या कंपनीची स्पर्धा इन्फोसिस आणि टीसीएस आदी कंपन्यांसोबत आहे. मात्र क्लिअरन्स घेण्यासाठी सरकारी अधिका-यांना लाच दिल्याचा आरोप अमेरिकन कॉन्ट्रॅक्टर आणि भारतीय कंपनी एल अँड टीवरही आहे. त्याची चौकशी सुरू आहे.
सुब्रमण्यन हे एल अँड टीच्या कन्स्ट्रक्शन बिझनेसचे प्रमुख असताना कंपनीतील काही कर्मचा-यांनी आरोप केला होता. या कर्मचा-यांच्या म्हणण्यानुसार चेन्नई आणि पुण्यातील कॉग्निजेंटच्या कार्यालय परिसरात ऑफिस कॅम्पस बांधण्यासाठी जलद मंजुरी मिळवण्यासाठी भारतीय सरकारच्या अधिका-यांना लाच दिल्याचा आरोप आहे. कॉग्निझेंट टेक्नॉलॉजिजकडून परमिटसाठी लाच घेतल्याचा लार्सन अँड टुब्रोवर आरोप आहे
सुब्रमण्यन यांनी १ ऑक्टोबर रोजी ए.एम. नाईक यांच्या जागी एल अँड टीचे अध्यक्षपद आणि प्रबंध संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यावेळी हा भ्रष्टाचार उघड झाला. नाईक यांनी १९९९ पासून या बांधकाम आणि इंजिनियंिरग कंपनीचे अध्यक्षपद भूषवले होते. सुब्रमण्यन यांच्याशिवाय एल अँड टीचे चार कर्मचारी रमेश वादीवेलू, आदिमूलम थियारजन, बालाजी सुब्रमण्यन आणि टी. नंदा कुमार आणि कॉग्निजेंटचे दोन माजी कर्मचारी वेंकेटेशन नटराजन आणि नागसुब्रमण्यन गोपालकृष्णन यांच्या साक्षी नोंदवण्याचीही अमेरिकी सरकारने मागमी केली आहे. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने अमेरिकेची ही विनंती फेटाळून लावली होती.