अकोला : प्रतिनिधी
स्वाईन फ्लू आजाराने तालुक्यातील गणोरे व पाडाळणे येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राजूर येथील एका स्वाईन फ्लू रुग्णावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यामध्ये डेंग्यूचे ७, चिकन गुनिया २ तर काही स्वाईन फ्लू सदृश्य रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
या आजारांना नेमके जबाबदार कोण, नागरिक, नगरपंचायत की, ग्रामपंचायत प्रशासन, असा प्रश्न सध्या आरोग्य विभागासाठी संशोधनाचा ठरत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागासह राजूर, अकोले शहरात मुख्य चौकांसह भरवस्तीतील अस्वच्छता, साठलेले डबके व कचराप्रश्नी सर्वस्वी नागरिकच जबाबदार असले तरी तोकडी यंत्रणाही तितकीच जबाबदार ठरत आहे. यामुळे सध्या ग्रामीण भागासह शहरात डासांच्या त्रासांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.