मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे.
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी आढावा घेतल्यानंतर शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार, पवारांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलिस दलाला (सीआरपीएफ) दिले आहेत. आता यापुढे शरद पवारांच्या सुरक्षेत सीआरपीएफच्या ५५ सशस्त्र जवानांचे पथक तैनात असेल.