18.6 C
Latur
Monday, November 11, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीला तीन मोठे धक्के; नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर

महायुतीला तीन मोठे धक्के; नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात राजकीय वातावरण आता तापू लागल असून नाराज असलेले नेते धक्का तंत्राचा वापर करू लागले आहेत. मात्र याचा सर्वाधिक फटका महायुतीला बसू लागला आहे. उद्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापूर दाखल होत आहेत मात्र याच्या एक दिवस अगोदरच महायुतीला एकाच दिवसात तीन मोठे धक्के बसले आहेत.

भाजप नेते समरजीत सिंह घाटगे हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनी देखील पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठवला आहे. यामुळे महायुतीच्या तीन मुख्य नेत्यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच महायुतीला मोठे धक्के लागले आहेत.

2019 नंतर राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर महाविकास आघाडी आणि महायुती उदयास आली. यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील झाल्याने अनेक ठिकाणी आता नाराजीचे सूर दिसू लागले आहेत. शिवाय विधानसभेसाठी जागा कमी आणि इच्छुक जास्त असल्याने जागा वाटपावरून वरिष्ठांची डोकेदुखी ही वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR