27.3 C
Latur
Sunday, November 10, 2024
Homeक्रीडारोनाल्डोने यूट्यूब चॅनेल केले लॉन्च, ९० मिनिटांत मोडले सर्व विक्रम

रोनाल्डोने यूट्यूब चॅनेल केले लॉन्च, ९० मिनिटांत मोडले सर्व विक्रम

नवी दिल्ली : पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने बुधवारी स्वत:चे यूट्यूब चॅनल उघडले आणि अवघ्या ९० मिनिटांत यूट्यूबवर सर्वांत जलद सब्स्क्राइबर्स मिळवण्याचे सर्व विक्रम मोडले. चॅनल लाँच झाल्याच्या अवघ्या ९० मिनिटांत रोनाल्डोने यूट्यूबवर १ दशलक्ष सब्स्क्राइबर्स मिळवले आहेत. रोनाल्डोने यूट्यूब चॅनेल लॉन्च करण्याची घोषणा करण्यासाठी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटचा आधार घेतला होता, ज्यावर त्याचे खूप फॉलोअर्स आहेत. रोनाल्डोचे एक्स प्लॅटफॉर्मवर ११२.६ दशलक्ष, फेसबुकवर १७० दशलक्ष आणि इन्स्टाग्रामवर ६३६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

रोनाल्डोने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली की, प्रतीक्षा संपली आहे. माझे यूट्यूब चॅनल आले आहे, त्याला सब्स्क्राईब करा आणि माझ्या या नवीन प्रवासात सामील व्हा, असे आवाहन त्याने आपल्या चाहत्यांना केले. रोनाल्डोने आपल्या चॅनलचे नाव ‘यूआर क्रिस्टियानो’असे ठेवले आहे. पोर्तुगालचा रहिवासी असलेल्या ३९ वर्षीय रोनाल्डोचा पहिला व्हीडीओ १३ तासांत ७.९५ दशलक्ष लोकांनी पाहिला. प्रत्येक तासाला लाखो लोक क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चॅनेलला सब्स्क्राईब करत आहेत. यामुळे तो विक्रम करत आहे. काही तासांतच त्याने यूट्यूबचे गोल्डन बटणही मिळवले आहे. रोनाल्डो सध्या सौदी प्रो लीगमध्ये अल नासरकडून खेळतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR