30.6 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरपृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली जरांगे यांची भेट

पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली जरांगे यांची भेट

मराठा आरक्षण, राजकीय मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती

जालना : प्रतिनिधी
राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून राजकारण तापले असताना दुसरीकडे राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकांचे वेधही लागले आहेत. त्यासाठी, रणनिती आखायला आणि विधानसभा मतदारसंघांची चाचपणी करायलाही सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीला फायदा झाला. त्यामुळे जरांगे यांच्या भेटी-गाठी सुरू झाल्या आहेत. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यावर उलट-सुलट चर्चा रंगली.

मनोज जरांगे यांनी निवडणुकीसाठी रणनिती आखायला सुरुवात केली असून विधानसभेत उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे २९ ऑगस्ट रोजी ते यासंदर्भातील निर्णयही जाहीर करणार होते. मात्र, विधानसभा निवडणुका लढवण्यासंदर्भातील घोषणेची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळे जरांगे खरेच निवडणूक लढवणार की, गत निवडणुकांप्रमाणे कोणाला तरी पाडा म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच आज पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरावाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. जरांगे यांनी निवडणुकीच्या संदर्भात घोषणा करण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी बैठक आयोजित केली होती. ती बैठक रद्द केली,

या भेटीत मराठा आरक्षण व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तसेच मराठा आरक्षणासंदर्भाने त्यांनीही त्यांच्या कार्यकाळात काम केल्यामुळे या भेटीत आरक्षणावरच चर्चा झाल्याचे समजते. मात्र, निवडणुकांपूर्वी किंवा मनोज जरांगे यांच्या निवडणूक लढवण्याच्या घोषणेपूर्वी चव्हाण यांनी जरांगेंची भेट घेतल्याने राजकीय उलथापालथ तर होणार नाही ना, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR