22.3 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयराजस्थानात यंदा ०.९ टक्के अधिक मतदान

राजस्थानात यंदा ०.९ टक्के अधिक मतदान

जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या १९९ जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. यंदाच्या निवडणुकीत राज्यात एकूण ७४.९६ टक्के मतदान झाले. २०१८ च्या निवडणुकीत राजस्थानात ७४.०६ टक्के मतदान झाले होते. म्हणजे या निवडणुकीत ०.९ टक्के जादा मतदान झाले. अशावेळी राज्यात मतदानाच्या ट्रेंडविषयी चर्चा सुरू झाली आहे.

राजस्थानात दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. मागील २० वर्षाचा मतदानाचा ट्रेंड पाहिला तर जेव्हा जेव्हा मतदान टक्केवारी घटली आहे त्याचा थेट फायदा काँग्रेसला झाला आहे आणि मतदान टक्केवारी वाढली त्याचा फायदा भाजपाला होतो. यावेळच्या निवडणुकीत १८६३ उमेदवार मैदानात उतरले होते. आता ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. तेव्हा राजस्थानात हा ट्रेंड कायम राहतो की गहलोत सरकार ही परंपरा मोडणार हे पाहणे गरजेचे आहे.

१९९ जागांसाठी झाले मतदान
राजस्थानात एकूण २०० जागा आहेत. परंतु मतदान १९९ जागांसाठी झाले. राज्यात २०१३ आणि २०१८ मध्येही १९९ जागांसाठी मतदान झाले होते. यावर्षी निवडणुकीच्या दरम्यान श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपूर जागेवरील काँग्रेस उमेदवार गुरमीत सिंह कूनर यांचे निधन झाले. अशावेळी निवडणूक आयोगानं येथील मतदान स्थगित केले. कूनर यांनी ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता या जागेवर पोटनिवडणूक घेतली जाईल. गुरमीत सिंह विद्यमान काँग्रेस आमदारही होते. त्यांनी २०१८ च्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवली होती आणि राज्य सरकारमध्ये मंत्री झाले होते.

राज्यातला मतदान ट्रेंड
राजस्थानातील मतदान ट्रेंड पाहिला तर विधानसभा निवडणुकीत मतदान कमी झाले तर काँग्रेस सरकार बनले आहे. १९९८ च्या निवडणुकीत ६३.३९ टक्के मतदान झाले होते तेव्हा राज्यात काँग्रेस सरकार बनले. गहलोत पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर २००३ च्या निवडणुकीत ६७.१८ टक्के मतदान झाले तेव्हा भाजपा सरकार बनले. त्यावेळी ३.७९ टक्के मतदान वाढले होते. वसुंधरा राजे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या होत्या. २००८ मध्ये ६६.२५ टक्के मतदान झाले तेव्हा काँग्रेस सरकार बनले. काँग्रेसनं तेव्हा ९६ जागा ंिजकल्या होत्या. तर भाजपाने ७८ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी ०.९३ टक्के मतदान घटले होते. गहलोत दुस-यांदा राज्यात मुख्यमंत्री झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR