34 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeराष्ट्रीयभाजपचे पाच आमदार रिसॉर्टमध्ये थांबल्याने 'लॉबिंग'ची चर्चा

भाजपचे पाच आमदार रिसॉर्टमध्ये थांबल्याने ‘लॉबिंग’ची चर्चा

जयपूर : राजस्थानमधील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पाच आमदार जयपूरमधील एका ‘रिसॉर्ट’मध्ये एकत्र थांबल्याने ‘लॉबिंग’च्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी अशी कोणतीही शक्यता फेटाळून लावली आहे. कोटा विभागातील आमदारांनी मंगळवारी रात्री सीकर रोडवरील एका रिसॉर्टमध्ये ‘चेक इन’ केले. त्यापैकी एका आमदाराला शंका आली कारण इतर आमदार कोतपुतली येथील दुसऱ्या रिसॉर्टमध्ये जाण्याबद्दल बोलत आहेत.

पक्षाचे काही नेते ‘रिसॉर्ट’वर पोहोचले आणि आमदारांना बुधवारी पहाटे पक्ष कार्यालयात आणण्यात आले. त्या आमदाराने वृत्तसंस्थेला सांगितले की, जे काही घडले त्याची माहिती मी पक्षाच्या नेत्यांना दिली आहे. पक्ष हे माझे कुटुंब आहे आणि ही आमची कौटुंबिक बाब आहे. कोटा विभागातील झालावाड जिल्ह्यातील झालरापाटन मतदारसंघाचे आमदार राजे दिल्लीत पोहोचले आहेत. राज्यातील २०० पैकी १९९ जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल रविवारी आले. भाजपला ११५ जागांसह बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत साशंकता कायम आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR