केज : माजी आमदार संगिता ठोंबरे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना बुधवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहिफळ वडमाऊली येथे घडली.
माजी आमदार संगिता ठोंबरे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना बुधवारी (ता.२८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहिफळ वडमाऊली येथे घडली असून या हल्ल्यात मारलेल्या दगडाने वाहनाची काच फुटली असून माजी आमदार संगिता ठोंबरे व वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत. या हल्ल्याच्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.