23.9 C
Latur
Monday, September 9, 2024
Homeमहाराष्ट्रपोर्शे कार अपघात; २६ सप्टेंबरला सुनावणी

पोर्शे कार अपघात; २६ सप्टेंबरला सुनावणी

मुलाचे प्रौढत्व, मोटार आणि पासपोर्टबाबत सप्टेंबरला होणार सुनावणी

पुणे : पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला प्रौढ समजून त्यावर खटला चालविण्यासाठी पोलिसांनी बाल न्याय मंडळात (जेबीबी) अर्ज दाखल केलेला आहे. तर अपघातातील कार परत मिळावी आणि मुलाचा पासपोर्ट परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांनी जेजेबी अर्ज केला आहे. या तीनही अर्जांवर आता २६ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

मुलाला प्रौढ ठरवत त्यावर खटला चालवायचा असेल तर या गुन्ह्यात पोलिसांना मुलाला जेजेबीमध्ये हजर केल्यापासून ३० दिवसांत पोलिस तपासाचा अहवाल (दोषारोपपत्र) दाखल करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळेत अहवाल सादर केला आहे. अपघाताच्या गुन्ह्यात मुलाला जामीन झाला आहे. तर त्याचे र्आइ-वडील आणि ससूनमधील डॉक्टर अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. अपघातातील कार परत मिळण्यासाठी तसेच अल्पवयीन मुलाचा पासपोर्ट मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांनी जेजेबीत अर्ज केला आहे. या अर्जावर २८ ऑगस्टला पुढील सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र ती पुढे ढकलण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR