पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक प्रमाणेच पॅरालिम्पिकमध्येही भारताने नेमबाजीतून पदकाची सुरुवात केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील गत चॅम्पियन अवनी लखेरा हिच्यासह १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच१ प्रकारात मोना अग्रवालने भारताला पदक मिळवून दिले.
अवनी लखेरा हिने टोकियो पॅरालिम्पिक २४९.६ हा रेकॉर्ड मोडित काढत २४९.७ गुणांसह नवा विक्रम प्रस्थापित केला. दुसरीकडे मोना हिने २२८.७ गुणांसह तिस-या स्थानावर राहिली. दक्षिण कोरियाच्या युनरी लीनं २४६.८ गुणांसह रौप्य पदक कमावले. ३७ वर्षीय पॅरा शूटर मोना अग्रवाल हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तीन प्रकारच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. महिला १० मीटर एअर रायफल स्टँडिंग आर २ स्पर्धेत कांस्य पदक पटकवाणीर मोना मिश्र ५० मीटर रायफल प्रोन आर ६ आणि महिला ५० मीटर रायफल ३ पोझीशन आर ८ मध्येही भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसेल.