15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात संविधान सन्मान दौड उत्साहात

पुण्यात संविधान सन्मान दौड उत्साहात

पुणे प्रतिनिधी : संविधान दिना निमित्त आयोजित ‘संविधान सन्मान दौड ’ मध्ये तब्बल ३१ देशातील विद्यार्थ्यासह एकूण सात हजार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डॉ .बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) आणि पुणे जिल्हा हौशी अ‍ॅथलेटीक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

मिनी मॅरेथॉन स्पर्धेला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वज दाखवून उद्घाटन करण्यात आले.आमदार सिद्धार्थ शिरोळे, मुख्य संयोजक परशुराम वाडेकर ,प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे ,पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार राहुल डंबाळे उपस्थित होते .

पाटील म्हणाले, आपल्या संसदेने संविधान स्वीकारलं याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त दरवर्षी संविधान सन्मान दौड आयोजित केली जाते. विविध कार्यक्रमातून हा दिवस साजरा केला जातो. संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे जास्त आवश्यक आहे. डॉ आंबेडकरांचे समस्त भारतीयांवर खूप मोठे उपकार आहेत. भारताची लोकशाही सुद्रूड करण्याचे काम त्यांनी केले.

स्पर्धेत धावू शकल्या नाही अशा महिलांनी ‘वॉक फॉर संविधान’ रॅली काढली होती. या वॉकची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली, विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला. मुख्य आयोजक परशुराम वाडेकर प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सचिव दीपक म्हस्के आणि मानसी बोकिल यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR