24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूर३ सप्टेंबर पासून बीसीजी लसीकरण

३ सप्टेंबर पासून बीसीजी लसीकरण

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यामध्ये ३ सप्टेंबर पासून बीसीजी लसीकरणाला कामाला सुरुवात होत असून यामध्ये जोखीमेच्या व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार आहे. जगाच्या तुलनेत २६ टक्के क्षयरुग्ण भारतामध्ये आहेत. क्षयरोग हा हवेद्वारे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस नावाच्या जिवाणुद्वारे होतो. एक थुंकी दुषित क्षयरुग्ण एका वर्षामध्ये १० ते १५ व्यक्तींना हा आजार पसरवतो, संसर्ग व प्रसार थांबवणे अत्यंत महत्वाचे आहे.

त्यासाठी लवकर निदान, लवकर उपचार सहवासितांची तपासणी व सहवासितांना टीबी प्रतिबंधात्मक औषधोपचार आयएनएच गोळी ६ महिने घेणे आवश्यक आहे. प्रौढ बीसीजी लसीकरण १८ वर्षावरील जोखमीच्या गटातील लोकांचे लसीकरण हे समाजातील नवीन क्षयरुग्ण कमी करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे. लसीकरण हे १८ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व खालील नमुद निकष पूर्ण करणा-या व्यक्तींना बीसीजी लसीकरण देण्यात येणार आहे. मागील ५ वर्षा पासूनचे उपचार पूर्ण झालेले क्षयरुग्ण, सक्रीय क्षयरुग्णांचे सहवासातील व्यक्ती, मधुमेह असणारे व्यक्ती, धुम्रपान करणारे व्यक्ती, बॉडी मॉड इंडेक्स (बीएमआय) १८ किग्रॅम/मिटर स्केअर पेक्षा कमी असलेले व्यक्ती, ६० वर्षाहून अधिक वयाच्या सर्व प्रोंढाना १८ वर्षावरील वर्गासाठी ही लस देण्यात येणार असून बी.सी.जी. लस देण्यासाठी आशा मार्फत लातूर जिल्ह्यात घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR