बीड : बीडसह हिंगोली जिल्ह्यात आज (दि.1) जोरदार हजेरी लावली. पावसामुळे परळी-बीड मार्गावरील पापनाशिणी नदीवर केलेला पर्यायी पूल वाहून गेलाय. त्यामुळे वाहतूक ठप्प झालीये. शिवाय वाण – वाप नदीच्या पुलावरूनही पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे परळीहून बीड कडे जाणारी वाहतूक ही नागापूरहून शिरसाळाच्या दिशेने वळवण्यात आली आहे. परळी – बीड राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा फटका आता प्रवाशांना बसताना दिसून येत आहे.
परळीकडून बीडकडे जाणारी वाहतूक ही नागापूर मार्गे शिरसाळाकडे वळवण्यात आली. या मार्गावर असलेल्या सेलू येथील पापनाशी नदीवर केलेला तात्पुरता पुल वाहून गेल्याने बीड – परळी वाहतूक बंद झाली आहे. वाण – वाप नदीवरील पुलावरूनही पाणी वाहू लागल्याने या पुलावरील वाहतूक बंद झालेली आहे.काही दिवसांपूर्वीच वाण नदीचा तात्पुरता पुल वाहून गेला होता पुन्हा सत दिवसानंतर तीच परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे. आज दिवसभरात झालेल्या पावसामुळे बीड परळी रोडवर पुलावरून पाणी जात असल्याने परळीकडून बीडकडे जाणारी वाहतूक ही नागापूर मार्गे शिरसाळाकडे वळवण्यात आली आहे.