परभणी : जिंतूर तालुक्यातील बोरी जवळ असलेल्या करपरा नदीला मोठा पूर आल्याने शनिवारी रात्री एक वाजल्यापासून वाहतूक ठप्प होती.
या नदीवरील जून्या व नवीन पुलावरून पाणी वाहत होते,सकाळी ते पाणी उतरले,सहा वाजता जुन्या पुलावरून पाणी वाहत होते, सकाळी आठ वाजता जुन्या पुलावरचेही पाणी उतरले परंतु पुलाला खेटून मोठे भगदाड पडल्याने मोठ्या वाहनाची वाहतूक सकाळी दहा वाजेपर्यंत ही बंद होती.
नऊ वाजल्यापासून नागापूर व चांदज येथील युवक व ग्रामस्थांनी मोठ मोठे दगड टाकून खड्डा बुजवल्याने सकाळी नऊ वाजल्यापासून मोटरसायकल, तीन चाकी व जीप, कार असे छोटया वाहनांची वाहतूक सुरू झाली .
परंतु मोठी वाहने अद्यापही नदीच्या दोन्ही बाजूंना रात्री एक वाजल्यापासून उभी आहेत.
बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच करपरा नदीला एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आला आहे