पूर्णा : तालुक्यातील एरंडेश्वर येथे दि. २५ नोव्हेंबर रोजी केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा एरंडेश्वर ग्रामपंचायत येथे शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार माधवराव बोथीकर व गटविकास अधिकारी मयूर कुमार आंदेलवाड उपस्थित होते. यावेळी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी संकल्प शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमास सरपंच राणी मुंजाजी पिसाळ, रितेश काळे, व्ही. के. पुरी, टी,डी पोटे विस्तार अधिकारी, डॉ.वैभव कांबळे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक के,एम.मस्के.उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी के. एन. खाडे, ग्राम विकास अधिकारी एरंडेश्वर, लिंबाजी पिसाळ, पांडुरंग काळे व एरंडेश्वर ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांनी प्रयत्न केले.