नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी महागाईमुळे लोकांनी ९ लाख कोटी रुपयांएवढी प्रचंड बचत खर्च केल्याचा अहवाल आलेला असताना आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरांनी खळबळजनक आकडेवारी दिली आहे. लोकांकडील ठेवींच्या स्वरुपात असलेला पैसा संपला असून लोकांची बचत निम्म्यावर आल्याचेही मायकल देवव्रत पात्रा यांनी म्हटले आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या कार्यक्रमात पात्रा यांनी ही माहिती दिली. ठेवींमध्ये कपात झाल्याने कुटुंबांची आर्थिक बचत आटत चालली आहे. हे लोक आता आर्थिक मालमत्तेपासून घरांसारख्या भौतिक मालमत्तांकडे वळू लागले आहेत. कोरोना काळाच्या बचतीच्या पातळीच्या जवळपास निम्मीच बचत आता लोकांकडे शिल्लक राहिली असल्याचे ते म्हणाले.
ठेवींची झीज झाल्यामुळे कुटुंबांची निव्वळ आर्थिक बचत घसरली आहे आणि आर्थिक मालमत्तेतून घरासारख्या भौतिक मालमत्तेकडे स्थलांतरित झाले आहे. अलीकडील महामारी २०२०-२१ च्या पातळीपासून जवळजवळ निम्मी झाली आहे. येत्या काळात उत्पन्न वाढल्याने पुन्हा ही कुटुंबे आर्थिक संचय करणार आहेत. ही प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे. ही मालमत्ता ०.९ टक्क्यांनी वाढल्याचे ते म्हणाले.
कोरोनानंतर कुटुंबांची भौतिक बचतही जीडीपीच्या १२ टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. २०१०-११ मध्ये हा आकडा जीडीपीच्या १६ टक्क्यांवर पोहोचला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला विकसित देश बनविण्याचे स्वप्न पुढील दशक हे वेगवान आर्थिक विकास दराने जायला हवे. तरेच २०४७ ला हे स्वप्न पूर्ण होईल असेही पात्रा यांनी स्पष्ट केले.