भारताच्या खात्यात चौथे सुवर्ण पदक, हरविंदरची नेत्रदीपक कामगिरी
पॅरिस : वृत्तसंस्था
भारताच्या हरविंदर सिंगने नेत्रदीपक कामगिरी करत तिरंदाजीच्या अंतिम फेरीत धडक मारत सुवर्णपदक पटकावले आणि भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे.
अंतिम लढतीत हरविंदर सिंगपुढे पोलंडच्या लुकासचे आव्हान होते. हरविंदर सिंगने पहिला सेट जिंकला. त्यानंतर त्याने बाकीचे दोन्ही सेट जिंकले आणि ६-० अशा फरकाने गोल्डमेडल पटकावले.
हरविंदरने पहिल्या सेटमध्ये दमदार कामगिरी केली. पहिला सेट २८-२४ असा जिंकला. त्यानंतर दुसरा सेट २८-२७ असा जिंकला आणि अखेरच्या सामन्यात शानदार विजय मिळवित गोल्ड मेडल जिंकले. भारताने यापूर्वी तीन सुवर्णपदके मिळवली होती. यात अवनी लेखराने नेमबाजीत भारताला पहिले गोल्ड मेडल जिंकवून दिले होते. त्यानंतर दुसरे गोल्ड मेडल बॅडमिंटनमध्ये मिळाले. भारता नितेश कुमार हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्यानंतर भारताला सुमीत अंतिलने तिसरे सुवर्ण पदक मिळवून दिले होते.
……………………………….