25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रआमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेत २ हजार रुपये देणार

आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेत २ हजार रुपये देणार

राहुल गांधींसमोर खरगेंची घोषणा

सांगली : महायुती सरकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून या योजनेची चर्चा राज्यभर सुरू आहे. विरोधक महाविकास आघाडीचे नेते या योजनेवरून महायुती सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. लाडकी बहीण योजनेची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली असून यामुळे लाखो महिलांना दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे. यातच काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्र दौ-यावर होते. यावेळी सांगली येथे झालेल्या सभेत आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे २ हजार रुपये करू, असे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले.

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हात लावला तो पडला, राम मंदिराला हात लावला ते गळत आहे, गुजरातच्या पुलाचे उद्घाटन केले तर तो पुल पडला, मोदी येत आहेत, म्हणून पुतळा लवकर बनवा आणि तो बनवला आणि पडला, अशी टीका खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर केली. आरएसएसवाले बनवतात ते पडत आहे. शाळेतील अभ्यासक्रम बदलत आहेत. संविधान बदलत आहेत. आणखी २० जागा मिळाल्या असत्या तर मोदी सरकार दिसले नसते, असा मोठा दावा खरगे यांनी यावेळी केला आहे.

खरी शिवसेना आमच्यासोबत आहे, खरी राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत आहे, त्यांच्या बाजूने सर्व नकली आहेत. आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला २ हजार रुपये देणार, तुम्ही तुमचा सन्मान मोदी यांच्यासमोर गहाण ठेवणार आहात का, मोदी सरकारने तोडण्या-फोडण्याच्या पलीकडे काय केल ते सांगा, महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच भाजपाचे सरकार जाईल, या शब्दांत खरगे यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे १ लाख ७० हजार मतांनी जिंकले आहेत. मात्र, विश्वजित कदम हे एका विधानसभेत १ लाख ४० हजार मतांनी जिंकले, असे सांगत नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR