25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रएकाच लाडक्या बहिणीने भरले तब्बल २८ अर्ज!

एकाच लाडक्या बहिणीने भरले तब्बल २८ अर्ज!

सातारा : प्रतिनिधी
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. महाराष्ट्र सरकारची ही योजना खूपच लोकप्रिय झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये देण्यात येत आहेत. मात्र, या योजनेच्या संदर्भात एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एका लाडक्या बहिणीने तब्बल २८ अर्ज दाखल केल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, यासाठी महिलांकडून अर्ज आणि कागदपत्रे मागवण्यात आली होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी ७ लाख भगिनींच्या खात्यात लाभाची रक्कम जमा करण्यात आली आहे. आता दुस-या टप्प्यात ५२ लाख भगिनींच्या खात्यात १५६२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा पद्धतीने १ कोटी ६० लाख महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे.

लाडक्या बहिणीने एकाच आधारकार्डवरून तब्बल २८ अर्ज भरले. लाडक्या बहीण योजनेत लाडक्या बहिणीने केलेला घोटाळा आता समोर आला आहे. पनवेलच्या एका महिनेने भरलेला अर्ज नाकारला गेला. पण, त्यामुळे सातारच्या महिलेचा घोटाळा उघडकीस आला आहे. अर्जदार २६ पण बँक अकाऊंट एक.. महिला एक पण गेटअप अनेक…. लाडकी बहीण योजनेचे पैसे उकळायला एका जोडप्याने लढवलेली शक्कल अखेर फेल ठरली आहे.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा लाभ अनेक महिलांनी घेतला. पण, या योजनेतही एका लाडक्या बहिणीचा आणि भावोजीने केलेला घोटाळा समोर आला. त्याचं झालं असं की, पूजा महामुनी नावाची खारघर येथील २७ वर्षीय महिला आपला अर्ज भरायला गेली. पण, त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही. तो वारंवार नाकारला जात होता. पूजा यांनी यासंदर्भात सखोल चौकशी केली. त्यावेळी त्यांना कळालं की, त्यांच्या आधार क्रमांकावरून यापूर्वीच अर्ज भरून झालाय. त्याचे दोन महिन्यांचे पैसेही बँकेच्या खात्यात जमा झाले आहेत. ही माहिती पाहून पूजा महामुनी यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या पहिल्यांदाच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत होत्या.

पूजा यांनी तात्काळ ही बाब पनवेलचे माजी नगरसेवक निलेश बावीस्कर यांना सांगितली. त्यांनी ज्यावेळी चौकशी केली. त्यावेळी लाडक्या बहिणीचा लालची घोटाळा समोर आला. या घोटाळ्यात साता-यातील खटाव येथील २२ वर्षीय प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेचे नाव समोर आले. तात्काळ साता-यातील महिला व बालविकास खाते अ‍ॅक्टिव्ह झाले. एक समितीही नेमण्यात आली. या समितीने सखोल चौकशी केल्यावर २२ वर्षांच्या लाडक्या बहिणीने तब्बल २८ बनावट अर्ज वेगवेगळ्या आधार क्रमांकावरून एकच अकाऊंट नंबर देऊन दाखल केल्याचे समोर आले. सध्या अर्जांची तपासणी सुरू आहे. बनावट अर्जांच्या आकड्यात वाढ होऊ शकते.

महिलेने हा घोटाळा कसा केला?
आरोपी महिलेने आपल्या नव-याच्या मदतीने ऑनलाईन अर्जावर वेगवेगळे फोटो अपलोड केले. काही अर्जांवर एकाच महिलेचा फोटो आहे. फक्त त्या महिलेचा गेटअप चेंज करण्यात आला. इतकंच नाही, तर आरोपीने प्रत्येक अर्जावर वेगवेगळे आधार क्रमांक दिलेत. विशेष म्हणजे हे सगळे अर्ज मंजूरही झालेत. फॉर्मवर दिलेल्या बँक खात्यांत दोन महिन्यांचे प्रत्येकी ३ हजार रुपये जमाही झाल्याचे समोर आलेत. सुदैवाने हा घोटाळा उघडकीस आला आहे. आता पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
पण, या घोटाळ्यावरून अनेक प्रश्न आता समोर आले आहेत. विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून सत्ताधारी जास्तीत जास्त महिलांचे फॉर्म भरून घेत आहेत. ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत, त्यांच्या अर्जांची पडताळणी होण्यापूर्वीच ते लाभार्थींच्या खात्यात पैसेही जमा होत असल्याची काही उदाहरणे आहेत. याचाच अर्थ निकषांची पडताळणी न करताच प्रशासकीय यंत्रणा लाभार्थींना पैसे वाटप करत आहे. निवडणुका झाल्यावर म्हणजे डिसेंबरमध्ये या अर्जांची छाननी होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR