21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeउद्योगयुपीआय : बँकेत न जाता जमा करता येणार पैसे!

युपीआय : बँकेत न जाता जमा करता येणार पैसे!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आता युपीआयच्या मदतीने तुमच्या बँक खात्यातही पैसे जमा करता येणार आहेत. यासाठी आधी कॅश डिपॉझिट मशीनवर जावे लागेल. तुम्हाला या मशीनवर क्यूआर कोड दिसू लागेल. त्याच्या मदतीने तुम्ही पेमेंट जमा करू शकाल.

यासाठी युपीआय अ‍ॅप उघडावे लागेल. इथे जाऊन क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. युपीआय अ‍ॅपवर स्कॅन केल्यानंतर तुम्ही जमा करणार होता तेवढीच रक्कम तुम्हाला दिसेल. शेवटी तुम्हाला पैसे जमा करण्याचे बँक खाते निवडावे लागेल. यामध्ये तुम्ही जो युपीआय पिन वापराल तुमचे पैसे त्याच बँक खात्यात पोहोचतील.

स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी यासह अनेक बँका आहेत ज्या युपीआयच्या मदतीने पैसे जमा करण्याचा पर्याय देतात. अलीकडे युनियन बँकेनेही हा पर्याय सुरू केला आहे. जे युजर सहज पेमेंट करू इच्छितात त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. याशिवाय यामध्ये अनेक खास फिचर्स देखील देण्यात आले आहेत. यामुळे युजर्सचा बराच वेळही वाचतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR