25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत ठाकरे गटाचा २२ जागांवर दावा; हालचाली वाढल्या

मुंबईत ठाकरे गटाचा २२ जागांवर दावा; हालचाली वाढल्या

मुंबई : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या दोन महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी गटासह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक होत आहे. या बैठकीत सर्वप्रथम मुंबईच्या जागांबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळे दावे करण्यात आले.

मुंबईत विधानसभेच्या एकूण ३६ जागा आहेत. या जागांपैकी शिवसेनेचा ठाकरे गट २० ते २२ जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. ठाकरे गटाच्या २२ संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. उद्धव ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री चेहरा घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र महाविकास आघाडी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या इतर घटक पक्षांनी उद्धव ठाकरेंची मागणी फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा नसताना निवडणुका लढवल्या पाहिजेत, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.

मुंबईतील ठाकरे गट २२ नावांवर प्राथमिक चर्चा करत आहे. याबाबक ठाकरे गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, विद्यमान आमदारांसोबतच नव्या तरुणांनाही विधानसभा निवडणुकीत संधी दिली जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आपल्या सर्वांना मान्य असेल, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. त्याचवेळी, गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली १४ जागा जिंकल्या होत्या. मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने तीन जागा जिंकल्या होत्या. अत्यंत कमी फरकाने चौथे स्थान गमावले. त्यामुळे ठाकरे यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुका ठाकरे गटासाठी अधिक महत्त्वाच्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR