24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeमनोरंजनटोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गदारोळ

टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गदारोळ

टोरंटो : इस्रायल-हमास युद्धाचाचे पडसाद ४८ व्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (टीआयएफएफ) पहावयास मिळाले. फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन समारंभ सुरू होताच, पॅलेस्टिनी समर्थक निदर्शकांनी प्रिन्सेस ऑफ वेल्स थिएटरमध्ये निदर्शने सुरू केली. यामुळे चांगलाच गदारोळ निर्माण झाला. यामुळे टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅमेरॉन बेली यांच्या भाषणात व्यत्यय आला आणि प्रायोजक रॉयल बँक ऑफ कॅनडाला (आरबीसी) गाझावरील हल्ल्यांसाठी इस्रायला निधी देणे थांबविण्याचे आवाहन केले.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी नरसंहार थांबवाच्या घोषणा ही दिल्या. आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे जवळपास चार मिनिटे कार्यक्रम परिसर दणाणून गेला होता. प्रदर्शन सुरू झाले तेव्हा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोही तेथे उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, हमासच्या दहशतवादी गटाने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यानंतर गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत ४०,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी एक निवेदन दिले की बायडेन प्रशासन कतार आणि इजिप्तसोबत पुढील काही दिवसांत इस्रायल आणि हमासला नवीन युद्धविराम प्रस्ताव सादर करण्यावर काम करत आहे.

टीआयएफएफ १५ सप्टेंबरपर्यंत राहणार सुरू
गुरुवारी सुरू झालेला टीआयएफएफ समारंभ ५ ते १५ सप्टेंबर या कालावधीत सुरू राहणार आहे. पुढील १० दिवसांमध्ये रॉन हॉवर्डचा सर्व्हायव्हल थ्रिलर ‘ईडन’, एमी एडम्ससह मेरीएल हेलरचा हॉरर कॉमेडी ‘नाईटबिच’, एर्न्ड्यू गारफिल्ड आणि फ्लॉरेन्स पग आणि जॉन क्रोलीचा ‘वुई लिव्ह इन टाइम’ अभिनीत अ‍ॅनिमेटेड ‘द वाइल्ड रोबोट’ असे चित्रपट कॅनेडियन प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केले जातील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR